मिझोराम : सायकल खाली येऊन जखमी झालेल्या कोबंडीच्या पिल्लाला रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या चिमुरड्याचा सन्मान करण्यात आला आहे. तुम्हाला वाटत असेल की यात काय एवढं विशेष, पण ही कहाणी अतिशय हृदयस्पर्शी आहे. या चिमुकल्याचा सन्मान त्याच्या शाळेने केला आहे. त्याला शाळेकड़ून प्रशस्तीपत्र, शाल आणि गुलाब देऊन त्याचा सन्मान केला आहे. या चिमूरड्याचे डेरेक सी लालचनहिमा असे नाव असून तो अवघ्या ६ वर्षांचा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बारक्याने काही दिवसांपूर्वी सायकल चालवत होता. त्या दरम्यान त्याच्या सायकलखाली कोंबडीचे पिल्लू आल्याने त्याचा मृत्यू झाला. परंतू डेरेकला हे लक्षात आले नव्हते. डेरेकने त्याला आपल्या नजीकच्या रुग्णालयात घेऊन गेला होता. 


तसेच त्याने आपल्याकडे असलेल्या १० रुपये उपचारासाठी खर्च करण्याची तयारी दाखवली होती. त्याच्या या भूतदयेचं सोशल मीडियावर चांगलेच कौतुक केले गेले. घडलेल्या सर्व प्रकरणाची हकीकत ही sanga says या फेसबुक प्रोफाईल वरुन पोस्ट करण्यात आली होती. या फेसबुक खातेधारकाने एका हिंदी चॅनेलला मुलाखत दिली.


'सायकल खाली आलेल्या पिल्लूचा मृत्यू झाला आहे. ही बाब डेरेकच्या लक्षात आली नव्हती. पिल्लूला रुग्णालयात घेूऊन चला अशी विनंती तो आपल्या आईवडिलांकडे करत होता. पंरतू तो मृत असल्याने त्याच्या पालकांनी नकार दिला. 


नकार दिल्याने हा चिमूरडा स्वत:च त्या पिल्लूला घेऊन एकटाच रुग्णालयाच्या दिशेने निघाला. त्याला वाचवण्यासाठी आणि उपचारखर्च म्हणून त्याने आपल्या पॉकेटमनीतील शिल्लक राहिलेली सर्वच्या सर्व १० रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवली' अशी प्रतिक्रिया sanga says या फेसबुक खातेधारकाने हिंदी चॅनेलसोबत बोलताना दिली.


डेरेकचा गौरव केल्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केल्यानंतर लाखापेक्षा अधिक लोकांनी हा फोटो शेअर केला गेला. हा सन्मान स्वीकारताना डेरेकच्या डोळ्यांमध्ये आनंदअश्रू पाहायला मिळाले. अशा परिस्थितीत कसे व्यक्त व्हावे असा पेच त्याच्यासमोर निर्माण झाला.


sanga says ने या चिमूरड्याचे शाळेकडून गौरव केल्याची माहिती फेसबुकद्वारे दिली. त्याने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, मला वाटतं आता पर्यंत हा मुलाची ओळख तुम्हाला पटली असेलच. डेरेकने प्राण्यांबद्दल दाखवलेल्या सहानभूतीसाठी त्याचा शाळेकडून गौरव करण्यात आला आहे. मिझोराममध्ये अशाच प्रकारे एखाद्याच कौतुक केले जाते.  मिजोरामच्या पंरपरेनुसार अतिथींचा गौरव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शाळ वापरली जाते. 


आधीच्या काळी धाडसी कामगिरी करणाऱ्याचा अशाच प्रकारे सन्मान केला जात असे. डेरेकला जी शाळ देऊन  गौरवण्यात आले, ती शाळीला तव्लहोह पुआन म्हटलं जातं. या शाळीने त्यांच्यातच सन्मान केला जातो , ज्यांच्याकडून समाजाला एखादे कार्य करण्यास प्रेरणा मिळते.   


sanga says ने या चिमूरड्याचे शाळेकडून गौरव केल्याची माहिती फेसबुकद्वारे दिली. त्याने आपल्या फेसबुकमध्ये लिहिले आहे की,


मला वाटतं आतापर्यंत या मुलाची ओळख तुम्हाला पटली असेलच. डेरेकने प्राण्यांबद्दल दाखवलेल्या सहानभूतीसाठी त्याचा शाळेकडून गौरव करण्यात आला आहे. मिझोराममध्ये अशाच प्रकारे एखाद्याच कौतुक केले जाते. 


 



 


मिझोरामच्या पंरपरेनुसार अतिथींचा गौरव करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शाल वापरली जाते. आधीच्या काळी धाडसी कामगिरी करणाऱ्याचा अशाच प्रकारे सन्मान केला जात असे. 


डेरेकला जी शाल देऊन गौरवण्यात आले, ती शालीला 'तव्लहोह पुआन' म्हटलं जातं. या शाळीने त्यांच्यातच सन्मान केला जातो, ज्यांच्याकडून समाजाला एखादे कार्य करण्यास प्रेरणा मिळते.