नवी दिल्ली : यूपीए २च्या काळात तत्कालीन लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह यांच्या बंडाचं कथित वृत्त काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी रचलेली कहाणी, असल्याचा दावा करण्यात आला आहे. द संडे गार्डियन याबाबत वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यूपीए-२ सरकारच्या काळात लष्कराच्या कथित बंडखोरीचं वृत्त म्हणजे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी रचलेलं कुभांड होतं, असं आता समोर येत आहे. दिल्लीमधल्या द सन्डे गार्डियन या वृत्तपत्रानं याबाबतची एक  बातमी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०११च्या अखेरीस आणि २०१२च्या सुरूवातीच्या काही महिन्यांमधील ही घटना आहे. त्यावेळी अण्णा हजारेंचं आंदोलन सुरू होतं. देशात सरकारविरोधात लाट होती. त्याच वेळी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी तत्कालिन लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंह बंड करून सरकार उलथवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू केली आणि त्याबाबत पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे कान भरले. गुप्तचर खात्यानं याचा पूर्ण तपास करून ही शक्यता फेटाळून लावली होती. मात्र त्यानंतर काही महिन्यांतच एका प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबत बातमी दिली.


यानंतर यावरून देशभरात गहजब झाला होता. विशेष म्हणजे जन्मतारखे वादावर जनरल सिंग यांच्या याचिकेवर सुनावणी होती, त्याच दिवशी हे वृत्त प्रसिद्ध झालं होतं. काँग्रेस अंतर्गत संघर्षातून ही बातमी मुद्दामहून पेरली गेल्याचंही सन्डे गार्डियन या वृत्तपत्रानं म्हटलंय. यामुळे दिल्लीतले राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे.