...तर त्याला अँकर जबाबदार असेल, बातमीदारांसाठीच मोठी बातमी; न्यायालयानं खडसावलं
टीव्ही अँकर्सबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तीचं मोठं वक्तव्य!
TV Anchor: माध्यमांच्या कार्यपद्धतीवर अनेकदा टीका केली जाते. मोठमोठ्याने आरडाओरडा करणारे प्राईम टाईमचे (Prime Time Show) शो किळसवाणे असल्याने माध्यमांविषयीची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून यावर टीका करताना दिसतात. अशातच आता न्यायमुर्ती के एम जोसेफ (Justice K M Joseph) यांनी माध्यमाद्वारे होणाऱ्या प्रक्षोभक वक्तव्यांवर मोठं वक्तव्य केलं आहे. (The Supreme Court Justice K M Joseph big statement about TV anchors)
टीव्ही हे प्रक्षोभक वक्तृत्वाचे व्यासपीठ बनले आहे. वादविवादात प्रक्षोभक वक्तव्य केली जाऊ नयेत ही अँकरची जबाबदारी असायला हवी, असं महत्त्वाचं वक्तव्य न्यायमुर्ती के एम जोसेफ यांनी केलं आहे. जर त्यांनी काही चूक केली तर त्याचा परिणाम पेमेंटवर होईल, असंही न्यायमुर्ती जोसेफ यावेळी म्हणाले.
वृत्तपत्र स्वातंत्र्य (Freedom of Press) महत्त्वाचे आहे पण नियमन न करता टीव्ही चॅनेल्स (TV Channels) हे द्वेषयुक्त भाषणाचे स्रोत बनले आहेत. दहा जणांना चर्चेसाठी बोलावले जाते. ज्यांना बोलायचे आहे ते निःशब्द आहेत. काहींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधीही मिळत नाही. या सगळ्याकडे केंद्र सरकार मूक प्रेक्षक का आहे?, असा सवाल देखील न्यायमुर्ती के एम जोसेफ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षात माध्यमांमधील स्पर्धा चिंतेचा विषय ठरला आहे. अनेकदा ब्रेकिंगच्या आत्मियतेमुळे महत्त्वाच्या घडामोडी राहुन जातात. तर प्राईम टाईमची चर्चा, चर्चा न राहता वादविवादात बदलते. त्यामुळे त्यातून साध्य काय होतं?, हा देखील एक चर्चेचाच विषय आहे.