नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कडाडल्याने देशातही पेट्रोल - डिझेलच्या किंमत वाढल्या आहेत. पेट्रोल 110 रुपये प्रति लिटरच्या पुढे तर डिझेलच्या किंमतींनी शंभरी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणावर लक्ष केंद्रीत केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यापुढे सर्व प्रकारची वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालवावीत यासाठी फ्लेक्स फ्युअल इंजिन विकसित करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सुद्धा देशातील ऑटोमोबाईल कंपन्यांना केले आहे.


देशात इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच 100 टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. येत्या काही वर्षात या गाड्या भारताच्या रस्त्यावर धावताना दिसून येतील. पूर्णपणे इथेनॉलवर चालणारे फ्लेक्स फ्युएल इंजिन हे इंटर्नल कॉम्बुत्शन इंजिन असते. एका इंधनावर तसेच मिश्रित इंधनावरही चालते. या इंजिनमध्ये कितीही ब्लेंडचे इंधन स्वयंचलित पद्धतीने ऍडजस्ट करण्याची क्षमता असते.


गेल्या आठवड्यात ऑटोमोबाईल कंपन्यांना येत्या 6 महिन्यात इथेनॉल इंजिन वाहने सादर करण्याच्या सूचना केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी दिल्या होत्या. फ्यूएल कम्पोझिशन सेन्सर तसेच सुटेबल ईसीयू प्रोग्रामिंगमुळे हे इंजिन 100 टक्के पेट्रोल किंवा  100 टक्के इथेनॉलवरही धावू शकते.ब्राझिल आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये अशी वाहने सध्या वापरात आणली जात आहेत.


उद्दिष्ट


  •  2022 पर्यंत सर्व पेट्रोलपंपावर 10 टक्के इथेनॉलमिश्रीत पेट्रोल सर्वच पेट्रोल पंपांवर मिळणार

  •   2023 पर्यंत पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण 20 टक्क्यांवर नेणार