मधु विहार : चोरीची एक अनोखी घटना समोर आली आहे. चोर आधी मंदिरात शिरला देवाच्या पाया पडला आणि मग त्याने दानपेटीवर डल्ला मारल्याची घटना घडली. ही घटना मंदिराच्या सीसीटीव्हीत (Temple CCTV) कैद झाली आहे. सीसीटीव्ही तपासून पोलीस आता चोराचा तपास करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधु विहार परिसरातील मयूरध्वज अपार्टमेंटमधील मंदिरात चोरीची (Temple Robbery) घटना घडली आहे. मध्यरात्री मंदिरात चोरटा शिरत त्याने दानपेटी फोडली.विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी गुन्हेगार देवासमोर हात जोडत नतमस्तक झाला, नंतर त्याने कान पकडून माफी मागितली. यानंतर त्याने दानपेटीचे कुलूप तोडून 3 लाख रुपये लांबवले. सीसीटीव्हीच्या कॅमेरात ही चोरीची घटना कैद झाली आहे. 


सीसीटीव्हीत घटना कैद
सीसीटीव्हीत (Temple CCTV) गुन्हेगार हात जोडलेला दिसत आहे. यादरम्यान तो मंदिरात काही संशयास्पद कृत्य करताना दिसत आहे. पूजास्थळाच्या बाहेर पडदा दिसतो. येथे काही घंटाही लटकलेल्या दिसतात. पडद्याआड गेल्याने सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरी स्पष्टपणे दिसत नाही.


दरम्यान सकाळी लोक मंदिरात (Temple Robbery) पूजा करण्यासाठी गेले होते तेव्हा ही घटना चव्हाट्यावर आली. मंदिरात पोहोचलेल्या लोकांनी पाहिले की दानपेटीचे कुलूप तुटले होते. पूजेच्या वस्तू इकडे तिकडे विखुरलेल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील नागरीकांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. 



मंदिरामागील (Temple Robbery) काटेरी तार कापून चोरटे आत शिरला असल्याची माहिती मयुरध्वज सोसायटीतील लोकांनी दिली आहे. तसेच मंदिरात 2 तास थांबून चोराने ही चोरी केल्याचा नागरीकांचा अंदाज आहे. तसेच सोसायटीतील नागरीकांनी पोलिस प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित केले. पोलिस या भागात क्वचितच गस्त घालतात. गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. या परिसरात रोजच गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. 


दरम्यान दिल्लीत ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या (Temple CCTV) आधारे पोलिस चोरट्याचा शोध घेत आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.