पणजी : गोव्यात नेतृत्वाबदलाची शक्यता भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी फेटाळून लावली आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी याबाबत शक्यता वर्तवली होती. काल रात्री महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदीन ढवळीकर आणि सरदेसाई गोव्यात परतले. मात्र आरोग्यमंत्री विश्वजित राणे दिल्लीतच मुक्कामी आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राणे, विनय तेंडुलकर आणि प्रमोद सावंत यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस असल्याची चर्चा आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नाराजी आमदार फ्रान्सिस डिसोझा यांनीही नाराजी व्यक्त केलीये. 


दुसरीकडे अद्याप काँग्रेसमध्येच असलेले विश्वजित राणेंचे वडील आणि माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी आयाराम गयारामांना पायबंद घातला पाहिजे, असं मत व्यक्त केलंय. विश्वजित यांच्याकडे नेतृत्व जाण्याच्या शक्यतेबाबत स्पष्ट बोलण्यास त्यांनी नकार दिला.