10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा होणार
कोरोनामुळे ५० टक्के शाळांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या नाहीत.
मुंबई : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहाता दहावी पाठोपाठ बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. पण परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आदेश शाळांना देण्यात आलेत. सीबीएसई प्रादेशिक विभागाच्या सूचनेनुसार शाळांना प्रात्यक्षिक परीक्षांच्या गुणांची नोंदणी करायची आहे. परीक्षा रद्द झाल्या असल्या तरी अंतर्गत मुल्यांकनाचे गुण पाठवायचे आहेत.
मात्र कोरोनामुळे ५० टक्के शाळांच्या प्रात्यक्षिक परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे शाळांनी आता बारावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची तयारी सुरू केली आहे. बारावीच्या परीक्षेच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. पण विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षा देण्यासाठी शाळेत जावे लागणार आहे.
12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी (HSC) महत्वाची बातमी आहे. राज्य सरकार दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा (HSC) रद्द करणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवलेला आहे