नवी दिल्ली : देशात कोरोना आता आटोक्यात येत आहे. पण, पहिल्या लाटेत देश जेव्हा लॉकडाऊनचे पालन करत होता. तेव्हा काँग्रेसने हद्द केली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना केला. कोरोना ही  वैश्विक महामारी होती. पण, त्याचेही राजकारण केले गेले. हे मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगले आहे का? असा सवालही त्यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संसदेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जनतेला कोरोना लसीच्या पहिल्या डोसच्या शत प्रतिशत जवळपास आपण पोहोचत आहोत. तर, सुमारे ८० टक्के जनतेला दुसरा डोस देण्यात आला आहे. मात्र, या काळातही काँग्रेसने राजकारण केले.


ज्यावेळी जगातील सारे तज्ञ् जिथे आहेत, तिथेच थांबा असे सांगत होते. सर्व जगात हा संदेश दिला जात होता. कारण, ती व्यक्ती संक्रमित असेल तर कोरोना तिथे घेऊन जाईल ही भीती होती.


पण, काँग्रेसने मुंबईत काय केले? मुंबईत परराज्यात राहणाऱ्या लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी प्रेरित केले गेले. मोफत तिकीट दिले गेले. तुम्ही जेथले आहेत तिथे जा. बिहारमधील आहात तर तिथे जा, युपीमधील आहेत तर तिथे जा, असे सांगण्यात आले. येथील श्रमिकांना त्यांनी अनेक संकटात लोटले.


दिल्ली सरकारनेही माईक घेऊन ठिकठिकाणी सांगितले की गावी जा, कोरोना आहे. दिल्लीमधून बसने सोडण्यात आले पण ते ही अर्ध्या रस्त्यात. त्यामुळे या श्रमिकांवर अनेक संकटे आली.


उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब या राज्यांमध्ये कोरोनाची लाट नव्हती, तीव्रता नव्हती. मात्र या कारणामुळे त्या राज्यांनाही कोरोनाचा विळखा बसला. हे कसले राजकारण आहे? संकटाच्यावेळीही यांना मानवता दिसली नाही? उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाब या राज्यात कोरोनाचा प्रसार होण्यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्राचे सरकार जबाबदार असल्याचा थेट आरोप मोदी यांनी केला.