1 September पासून गॅस सिलिंडर आणि बँकिंग क्षेत्रासंबंधित `हे` नियम बदलणार, तुमच्यावर कसा होणार परिणाम?
ऑगस्ट महिना संपत आला आहे. 1 तारखेपासून नवा महिना सुरु होणार आहे. नियमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे नव्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कदाचित झटका लागू शकतो.
ऑगस्ट महिना संपत आला आहे. 1 तारखेपासून नवा महिना सुरु होणार आहे. दर महिन्याला नियमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे नव्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कदाचित झटका लागू शकतो. तुम्हाला कोणत्या बदलांचा सामना करावा लागू शकतो, याबाबत आधीच माहिती असलेली बरी. यातील काही बदल तुमच्या खिशाला आराम तर काही तुमचं बजेट वाढवणारे ठरू शकतात. जाणून घेऊयात 1 तारखेपासून कोणते नवे बदल होणार आहेत.
PNB च्या ग्राहकांनो लक्ष द्या
पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी विशेष अपडेट. पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनो 31 ऑगस्टपर्यंत KYC अपडेट करायला विसरू नका. तुमी KYC अपडेट केली नाही तर सणासुदीत तुमचं अकाऊंट ब्लॉक होऊ शकतं. अशात तुम्हाला आर्थिक व्यवहार जगताना त्रासाचा सामना करावा लागू शकतो.
विमा पॉलिसीच्या प्रीमियममध्ये कपात
IRDAI च्या माहितीनुसार 1 सप्टेंबरपासून विमा पॉलिसीचा प्रीमियम कमी होणार आहे. जनरल इंश्युरन्स नियमांमध्ये नुकतेच काही बदल करण्यात आले आहेत. या नव्या नियमान्वये ग्राहकांना आता 30% ते 35% एजंट कमिशनऐवजी केवळ 20% एजंट कमिशन द्यायला लागणार आहे. यामुळे तुमचा प्रीमियम कमी होणार आहे.
गॅस सिलिंडर किमतीत होणार बदल
याशिवाय तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडर किमतीचा आढावा घेऊन यामध्ये आवश्यक बदल करतात.1 सप्टेंबररोजी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर केले जातील. यामध्ये वाढ किंवा दरकपात पाहायला मिळू शकते.