बापरे, 6 राज्य कोविड संवेदनशील, महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मस्ट
देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. (Coronavirus in India) महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आहे. प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
मुंबई : देशात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. (Coronavirus in India) महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आहे. प्रत्येक मिनिटाला एकाचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे यापुढे खबरदारी घेण्यात येत आहे. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट मस्ट असणार आहे. ही सहा राज्ये कोरोना संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना 48 तासांपूर्वीचे RT- PCR test बंधनकारक करण्यात आले आहे. (These six states have been declared as Corona Sensitive, Maharashtra from these six states will be required to have a negative corona test report.)
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. (Coronavirus in Maharashtra) रेमडेसिवीर औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढला आहे. तसेच कोरोनाची रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आली आहेत. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि उत्तराखंड या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक असणार आहे. तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील नियमाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (Maharashtra Travel Guidelines negative corona test report)
रेल्वे प्रवासासाठी नियमावली
राज्य सरकारकडून रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी 'ब्रेक द चैन'अंतर्गत कोविड नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वेतून प्रवास करताना आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी negative corona test report बंधनकारक आहे. केरळ, गोवा, राजस्थान, गुजरात, दिल्ली आणि एनसीआर, उत्तराखंड या सहा राज्यांना कोविड संवेदनशील राज्य म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यानुसार या सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना 48 तास आधी कोरोना चाचणी अनिर्वाय आहे. तसेच या कोविड चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल त्यांनाच महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार आहे, असे यात म्हटलं आहे.
तसेच केवळ आरक्षित असलेल्या प्रवाशांना गाड्यांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशाला कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणे आहे की नाही, याची खात्री करुनच परवानगी दिली जाणार आहे. त्याशिवाय रेल्वे प्रशासनाने या राज्यातून येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे गाड्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला द्यावी, असेही नव्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. तसेच अनेकदा लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये कोविड संदर्भातील सर्व नियमाचे पालन करावे, अशी सूचनाही करण्यात आल्या आहेत.