मुंबई : भारतामध्ये कोरोना व्हायरस आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ३० जानेवारीला भारतात केरळमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. यानंतर कोरोना देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचला. चीनमध्ये सगळ्यात पहिले आढळलेल्या कोरोना व्हायरसने जगात अनेकांचे बळी घेतले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनामुळे चीन आणि इटलीचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. भारतामध्ये पुणे, मुंबई, दिल्ली. बंगळुरू, जयपूर, आग्रा, हैदराबाद आणि जम्मू काश्मीरपर्यंत कोरोना पोहोचला आहे. 


भारतामध्ये आतापर्यंत कोरोनाचे २ बळी गेले आहेत. दिल्लीमध्ये कोरोनामुळे एका वृद्ध महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या महिलेचा मुलगा इटलीवरुन परत आला होता. या महिलेला मधुमेह होता. तसंच तिला कफही झाला होता.


कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये एका ७६ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार मृत झालेली व्यक्ती २९ फेब्रुवारीला सऊदी अरबच्या जेद्दाहहून परत आली होती. कोरोनाची लक्षण आढळल्यानंतर या व्यक्तीला नातेवाईकांनी १० मार्चला हैदराबादच्या एका रुग्णालयात दाखल केलं. चांगल्या उपचारांसाठी कुटुंब रुग्णाला पुन्हा कलबुर्गीला आणत होतं, पण रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.


भारतामध्ये गुजरात, हिमाचल प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, आसाम, गोवा, मध्य प्रदेश, मणीपूर, मेघायल, मिझोराम, नागालँड, सिक्किम, त्रिपुरा ही राज्य आणि अंदमान-निकोबार, दादरा-नगर हवेली, दीव दमण, लक्षद्विप, पुदुच्चेरी या केंद्रशासीत प्रदेशात कोरोना पोहोचलेला नाही.


कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव हा भारतात परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे झाला आहे. गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणावर परदेशी पर्यटक येत असले, तरी हे राज्य कोरोनापासून मुक्त राहिलं आहे.


कोरोना बाधित राज्य


महाराष्ट्र- ३९ रुग्ण


पंजाब- १ रुग्ण


केरळ- २२ रुग्ण


दिल्ली- ७ रुग्ण


जम्मू-काश्मीर- २ रुग्ण


लडाख- ३ रुग्ण


राजस्थान- एकूण ४ रुग्ण (२ परदेशी)


उत्तर प्रदेश- एकूण १२ (एक परदेशी)


कर्नाटक- ७ रुग्ण


तामीळनाडू- १ रुग्ण


तेलंगणा- ३ रुग्ण 


हरियाणा- १४ रुग्ण (सगळे परदेशी)


आंध्र प्रदेश- १ रुग्ण


उत्तराखंड- १ रुग्ण


ओडिशा- १ रुग्ण