Retirement Planning : आत्तापासूनचं तुम्ही रिटायरमेंटचा प्लॅन करताय तर तुमच्यासाठी काही विशेष योजना आहेत ज्यात गुंतवणूक केलीत तर तुम्हाला मजबूत परतावा मिळू शकतो. तुम्ही long term investment आणि Retirement planning चा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी (VPF) आणि इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS) या तीन योजना नक्कीच फायदेशीर ठरतील. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी- PPF
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही योजना बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये कुठेही उघडली जाऊ शकते. ती उघडण्यासाठी फक्त 500 रुपये पुरेसे आहेत. प्रत्येक वर्षी एकाच वेळी 500 रुपये जमा करणे आवश्यक आहे. खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. ही योजना 15 वर्षांसाठी आहे. मध्येच यातून पैसे काढता येत नाहीत. परंतु 15 वर्षांनंतर ही योजना 5-5 वर्षांसाठी वाढवता येते.


PPF 15 वर्षापूर्वी बंद करता येत नाही परंतु 3 वर्षानंतर या खात्यावर कर्ज घेता येते. जर कोणाला हवे असेल तर तो नियमांनुसार 7 व्या वर्षापासून या खात्यातून पैसे काढू शकतो. व्याजदरांचे प्रत्येक तिमाहीत पुनरावलोकन केले जाते. व्याजदर जास्त किंवा कमी असू शकतात. सध्या या योजनेसाठी 7.1 टक्के व्याज दिले जात आहे. 80C अंतर्गत तुम्हाला योजनेतील गुंतवणुकीवर 1.5 लाख रुपयांपर्यंत कर सवलतीचा लाभ मिळतो. 


ऐच्छिक भविष्य निर्वाह निधी - VPF
VPF (स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधी) मध्ये गुंतवणूक करण्याची मर्यादा नाही. VPF मध्ये देखील EPF प्रमाणे 8.1 टक्के व्याज दिले जाते. मूळ पगाराच्या 100% आणि DA (महागाई भत्ता) यामध्ये गुंतवता येईल. यासाठी तुम्हाला तुमच्या कंपनीच्या HR किंवा फायनान्स टीमशी संपर्क साधावा लागेल. तुमच्या EPF खात्यावर VPF जोडले जाईल. 


तुम्ही नोकरी बदलल्यास तुम्ही हे खाते सहज हस्तांतरित करू शकता. यावर कर्जही उपलब्ध आहे. यातून मुलांचे शिक्षण, गृहकर्ज, मुलांचे लग्न यासाठीही कर्ज घेता येते. VPF खात्यातून अंशतः पैसे काढण्यासाठी खातेदाराने 5 वर्षे काम करणे आवश्यक आहे. जर ते 5 वर्षांपेक्षा कमी असेल तर कर कापला जातो. VPF ची संपूर्ण रक्कम निवृत्तीनंतरच काढता येते. VPF ला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर कपातीचा लाभ मिळतो. गुंतवणूक, व्याज आणि मॅच्युरिटी (EEE) वर मिळणारे पैसे पूर्णपणे करमुक्त असतात. 


इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम - ELSS
जर तुम्हाला दरमहा गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही दरमहा किमान 500 रुपये गुंतवणे सुरू करू शकता. यामध्ये जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये कर सूट मिळू शकते परंतु कमाल गुंतवणुकीवर कोणतीही मर्यादा नाही.