सावध राहा! हे तुमच्याबरोबरही घडू शकतं; पाकिटमार कशी चोरी करतात एकदा हा Video पाहाच
Thief Stealing Purse From Passenger Pocket: दाटीवाटीमध्ये बसच्या दारातून आत जाण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीबरोबर घडलेला प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.
Thief Stealing Purse From Passenger Pocket: गर्दीच्या ठिकाणी खिसेकापूंपासून सावध राहा असं अनेकदा सांगितलं जातं. अशा पद्धतीचे फलकही अनेकदा प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी, रेल्वे स्थानक अथवा बस स्टॉपवर दिसून येतात. मात्र असं असतानाही काही चोर हातचलाखी करुन लोकांना गंड घालतात. अगदी थोडीशी जरी संधी मिळाली तरी हे खिसेकापू हाथ साफ करतात. सोशल मीडियावर अनेकदा अशापद्धतीने चोरी केल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा हे व्हिडीओ पाहून चोर कशाप्रकारे गर्दीचा फायदा घेत हात साफ करतात हे दिसून येतं. हे व्हिडीओ पाहून खरोखरच थक्क व्हायला होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नक्की घडलं काय?
व्हायर झालेला हा व्हिडीओ कर्नाटकमधील असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये गर्दी करुन लोक बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत. दाटीवाटीने काही महिला आणि 2 पुरुष प्रवासी बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यावेळी हिरव्या रंगाचं शर्ट घातलेला एक खिसेकापू त्याच्या समोर बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या काळ्या टी-शर्टमधील व्यक्तीच्या जिन्सच्या खिशात हात घालतो. ही व्यक्ती बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असतानाच हा खिसेकापू हळूच या व्यक्तीच्या जीन्समधील मागील खिशातील पाकिट काढून घेतो. त्यानंतर हा खिसेकापू बसमध्ये चढण्याऐवजी मागे येतो आणि बस पकडतच नाही. विशेष म्हणजे हा सारा घटनाक्रम एवढ्या वेगाने झाला की ज्या व्यक्तीचं पाकिट चोरीला गेलं त्याला कळलंही नाही.
कॅप्शनमध्ये काय म्हटलं आहे?
हा व्हिडीओ 2 आठवड्यांपूर्वीचा असून अजूनही तो व्हायरल होत आहे. या व्हिडीओला, "बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असलेल्या व्यक्तीच्या खिशातून पाकिट चोरल्याचा व्हिडीओ कोणीतरी शूट केला आहे. आज मी जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्यावर आजची तारीख दिसली. मात्र ही घटना नेमकी कुठे घडली याची काही कल्पना नाही," अशी कॅप्शन देण्यात आली आहे. "लोकांनी अशा चोरांपासून सावध रहावं या उद्देशाने हा व्हिडीओ शेअर केला आहे," असंही कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
व्हिडीओ शूट करण्याऐवजी चोर पकडायचा ना
व्हायरल झालेला हा व्हिडीओ बसच्या दरवाजापासून काही अंतरावर मागील बाजूला उभ्या असलेल्या एका व्यक्तीने त्याच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद करण्याऐवजी चोराला पकडायला हवं होतं असं म्हटलं आहे. अनेकांनी व्हिडीओ शूट करण्याऱ्याविरोधातच कमेंट सेक्शनमध्ये संताप व्यक्त केला आहे.