मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हे रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्नही केले जात आहे. शनिवारीच देशात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळूनही चक्क चोरांना पकडताना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. तर झालं असं पंजाबमधील लुधियानामध्ये पोलिसांनी ज्या चोराला पकडलं आहे. त्या चोरालाच कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची १२ जणांना लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गुरूवारी लुधियानात पोलिसांनी गणेश नगरमध्ये दोन चोर पकडले. त्यानंतर त्यांना न्यायालयात सादर करण्यात आलं. त्यावेळी न्यायाधिशांना त्यांच्या खोकण्यावरून हे चोर कोरोनाबाधित तर नाहीत अशी शंका आली. तपासणी केल्यानंतर या दोघांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. 


आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं कळताच एक चोर पळून गेला. आता दुसरा चोर, न्यायाधिश आणि सात पोलिस क्वारंटाइन असून पळून गेलेल्या चोराचा तपास घेतला जात आहे. 


लुधियाना एकूण १२ कोरोनाबाधित आहेत. यामध्ये एक जालंधरचा तर दुसरा रूग्ण हा बरनालाचा असून त्याचा मृत्यू झाला आहे. तर आता या चोरांना कोरोनाची लागण झाल्याचं उघडकीस आहे. त्याचप्रमाणे अमरपुरामध्ये देखील काहींना कोरोनाची लागण झाली आहे. तिथे राहणाऱ्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आता तिच्या संपूर्ण कुटुंबाला क्वारंटाइन केलं आहे.



तसेच एका लहान मुलाचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. लुधियानात आतापर्यंत कोरोनामुळे तिघांनी आपला जीव गमावला आहे. ज्यामध्ये २ महिलांचा समावेश आहे.