चोरानं उप-जिल्हाधिकाऱ्याच्या घरात बसून लिहिलं पत्र... आणि चिठ्ठी लिहून मांडली व्यथा
उप-जिल्हाधिकाऱ्याच्या घरात बसून चोरानं लिहिलं पत्र... काय म्हटलंय पाहा फोटो
नवी दिल्ली: गावातले किंवा आपले प्रश्न घेऊन आपण प्रशासनाकडे जातो. घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी मात्र तिथे बसून त्यांची व्यथा मांडली आहे. उप जिल्हाधिकाऱ्याच्या घरात चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांनी चक्क त्यांनाच पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. चोरांनी लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही चिठ्ठी वाचून तुम्हीही एक क्षण चक्रावून जाल.
सोशल मीडियावर ही चिठ्ठी व्हायरल झाली आहे. याचा फोटो सर्वात पहिल्यांदा सुप्रिया भारद्वाज यांनी सोशल मीडियावर शेअर केला. ही चिठ्ठी वाचून नेटकरी देखील हैराण झाले आहेत. ह्या चिठ्ठीमध्ये चोरांनी म्हटलं की, जर पैसे नाही तर लॉक करायला नको होतं कलेक्टर. असं लिहून चक्क चोरांनी उप जिल्हाधिकाऱ्याच्या घरात चिठ्ठी ठेवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील देवास इथल्या उप जिल्हाधिकाऱ्याच्या बंगल्यावर चोरी करण्यासाठी अज्ञात पोहोचले. चोरांनी तिथे गेल्यानंतर हात साफ कऱण्याऐवजी आपलं दु:ख सांगत एक चिठ्ठी लिहिली. त्यांचं धाडस पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. चोरांनी लिहिलेल्या चिठ्ठीचा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
अनेक नेटकऱ्यांनी या घटनेला गजब असं कमेंट्मध्ये म्हटलं आहे. लाखो लोकांनी हा फोटो पाहिला असून 1700 हून अधिक युझर्सनी हा फोटो लाईक केला आहे. तर अनेकांनी रिट्वीटही केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार SDM त्रिलोचन गौड़ इथल्या सिव्हिल लाइन परिसरात सरकारी बंगल्यावर ही घटना घडली आहे. उप जिल्हाधिकारी 15 दिवसांपासून आपल्या घरीच आले नव्हते.
जेव्हा ते देवासा इथल्या बंगल्यावर पोहोचले तेव्हा त्यांना बंगल्यामधील सर्व सामान अस्थाव्यस्त असल्याचं दिसलं. घरातील काही महत्त्वाच्या वस्तू गायब होत्या. आपल्या घरात चोरी झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. उप जिल्हाधिकाऱ्यांच्या घरात चोरांनी लिहिलेली चिठ्ठी देखील सापडली. या प्रकरणी उप जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.