रांची : सीबीआयच्या विशेष कोर्टाने आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्यातील आणखी एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. या प्रकरणाचा युक्तीवाद १९ जानेवारीला पूर्ण झाला होता आणि कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्याना याप्रकरणी आजच शिक्षा सुनावण्यात येईल.


माजी मुख्यमंत्री मिश्राही दोषी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात लालू यादव यांच्यासोबत बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. सीबीआय आर्थिक गुन्हे शाखेनुसार, ९५० कोटी रूपयांच्या चारा घोटाळा संबंधी चाईबासा कोषागारातून ३५ कोटी ६२ लाख रूपये चुकीच्या मार्गाने काढल्याप्रकरणी त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. 



लालू यादव आधीच तुरुंगात


देवघर कोषागार प्रकरणासाठी लालू यादव आधीच साडे तीन वर्षांची शिक्षा भोगत आहेत. ते सध्या रांचीच्या बिरसा मुंडा तुरुंगात कैद आहेत. गेल्या ६ जानेवारीला सीबीआयच्या कोर्टाने लालू यादव यांनी शिक्षा सुनावली होती.