नवी दिल्ली : देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू होताच अशी गर्दी पुन्हा होऊ लागलीय. हीच गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या (Corona virus 3rd wave) लाटेला आमंत्रण देणार आहे. तिसऱ्या लाटेसंदर्भात एम्सचे (AIIMS) प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria) यांनी महत्त्वाचा इशारा दिलाय. आपण कोविडच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतून काहीही धडा घेतल्याचं सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत नाही. पुन्हा एकदा गर्दी दिसून येतेय. अनेक लोक एकत्र येत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या सहा ते आठ आठवड्यांत करोना संक्रमणाची तिसरी लाट दाखल होऊ शकते, असं गुलेरिया यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


महाराष्ट्रातही पुढच्या एक ते दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जातेय.



कोरोना विषाणूची तिसरी लाट देशात सर्वसाधारणपणे तीन महिन्यासाठी असेल. मात्र, वेगवेगळ्या फॅक्टर्सनुसार हा कालावधी कमीही असू शकतो. कोरोना नियमांचं पालन करणं सक्तीचं आहेच. कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करणं आवश्यक आहे.