Boy Ate 150 Rasgulla: सध्या लग्न समारंभांचा कालावधी सुरु आहे. दर आठवड्याला कोणाच्या ना कोणाच्या ओळखीतील लग्न, साखरपुडा किंवा इतर कार्यक्रम असतात. अगदी प्रत्यक्षात आपण या कार्यक्रमांना गेलो नाही तरी सोशल मीडियावरुन नक्कीच या असा कार्यक्रमांची माहिती मिळते. त्यातही लग्ना गेल्यानंतर दणकून खाणाऱ्यांची संख्या भारतामध्ये फारच आहे. लग्नाला जाणं म्हणजे जेवणाचा आस्वाद घेणे असं समिकरणं अनेकांसाठी अगदी आजही कायम आहे. अर्थात प्रत्येकजण लग्नामध्ये त्याच्या आवडत्या पदार्थाचं मनसोक्तपणे सेवन करतो. पण तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ तुम्ही किती प्रमाणात खाऊ शकता? म्हणजे गुलाबजाम असेल तर जास्तीत जास्त 7 ते 8 गुलाबजाम खाता येतील किंवा कोणतीही गोष्टी नगानुसार विचार केला तर दुहेरी आकडा गाठणंही कठीण असं सर्वसाधारणपणे म्हणता येईल. मात्र एखाद्या तब्बल 150 रसगुल्ले लग्नाच्या जेवणात खाल्ल्याचं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण खरोखर असा प्रकार घडला आहे.


पाहुण्यांचं जेवण झाल्यानंतर जेवत होता


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर बिहारमधील एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काहीजण लग्न समारंभातील भोजनाचा आनंद घेता दिसत आहे. मात्र या व्हिडीओमध्ये दिसणारी एक व्यक्ती चक्क 150 रसगुल्ले काही तासांमध्ये खाऊन फस्त करते. लग्नाला आलेले सर्व पाहुण्यांचं जेवण उरकल्यानंतरही ही व्यक्ती आपल्या मित्रांबरोबर बसून रसगुल्ले खात होता.


कोण आहे हा तरुण?


सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यानुसार बिहारमधील दरभंगा येथील एका लग्न समारंभातील हा व्हिडीओ आहे. विक्रमी संख्येनं रसगुल्ले फस्त करणारा हा तरुण तब्बल 4 तास जेवत होता. मुलीकडून पाहुणा म्हणून आलेल्या या तरुणाला मुलीच्या घरचे आग्रह करुन जेवायला घालत होते. सोशल मीडियावरील दाव्यानुसार या तरुणाचं नाव त्रिलोक पाठक असं आहे. तो दरभंगामधील बिरोल येथील हरौली गावाचा रहिवाशी आहे. त्रिलोक प्रत्येक लग्नामध्ये अशाच पद्धतीने जेवतो, असं गावकऱ्यांनी सांगितल्याचं वृत्त 'डेली बिहार'ने दिलं आहे. कधी 100-150 रसगुल्ले खातो तर कधी 100-150 आंबे खातो. पोटभर जेवल्यानंतर त्रिलोक 2 ते 4 किलो नुसतं दही खाऊ शकतो, असा गावकऱ्यांचा दावा आहे.


4 तास जेवत होता


मिथिला हा प्रांत तेथील खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील पाहुणचाराची चर्चा संपूर्ण बिहारमध्ये असते. मिथिला संस्कृतीची ओळख असलेल्यांना मुलीकडील नातेवाईक कशापद्धतीने आग्रहाने आपल्या पाहुण्यांना खाऊ घालतात याची कल्पना आहे. आग्रह करुन नातेवाईकांना खाऊ घालण्याची येथे परंपराच आहे. त्रिलोकलाही अशाच पद्धतीने तब्बल 4 तास जेवू घालण्यात आलं.