मुंबई : स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी... अशा शब्दात आईच्या प्रेमाचं वर्णन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आई ही प्रत्येकाच्या जीवनातील अशी व्यक्ती आहे जिच्यासाठी सर्वचजण अगदी हळवे असतात. तिच्या शब्दापुढे जाण्यासाठी सहसा कुणी धजावत नाही. आई आपल्या गर्भात बाळाला जे ९ महिने सांभाळते आणि त्यानंतर ती ज्या वेदना सहन करून बाळाला जन्म देते त्या उपकाराची फेड जन्मात होऊ शकत नाही. 


या आईच्या प्रेमाची आणि तिच्या कतृत्वाची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ गेल्या कित्येक दिवसांपासून व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला प्रचंड पसंती मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यक्रमात जगराता किंवा जागरण ठेवतात त्यावेळचा हा व्हिडिओ आहे. हा लहान मुलाची आपल्या गाण्यांमधून आणि कथेतून आईचा महिमा सांगत आहे. १५ मिनिटांचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आणि आईप्रती कृतज्ञतेने तुमचा उर भरून आल्याशिवाय राहणार नाही. 


नेमकं काय आहे या व्हिडिओत? 


का न जाने कैसे कैसे खयालों में खो जाते थे हम 
कोई दाट भी देता था तो रो जाते थे हम
आज तो गोलिंया खाँ कर भी निंद नही आती
पेहले तो माँ के रोली सुनकर सो जाते थे हम 



अशा अनेक शायरीमधून देखील या मुलाने आईचं प्रेम पुन्हा एकदा सर्वांसमोर आणलं आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो प्रत्येकजण टाळ्या वाजवत आई प्रती कृज्ञत होत आहे. अगदी शेवटी काही जण रडताना आपल्या दिसतात. एक ना अनेक गाणी गाऊन आणि गोष्टी सांगून त्याने हे जागरण केलं आहे.