मुंबई : ज्याप्रमाणे आपल्याला शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी शारीरिक व्यायाम आवश्यक असतो, त्याचप्रमाणे मेंदूला तीक्ष्ण आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्याला त्याच्या व्यायामाची गरज असते. यासाठी आपण मेंदूला चालणा मिळण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करुन पाहू शकता. जसे की, कोडं सोडवणे. प्रश्नांची उत्तरं देणे, काही गोष्टी लक्षात ठेवणे, तसेच ऑप्टिकल इल्युजन इत्यादींची आपण मदत घेऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. जो तुम्हाला विचार करायला भाग पाडेल. इतकेच काय तर ते तुमचं व्यक्तीमत्व देखील सांगतं.


या फोटोतील एका चेहऱ्यात दोन चेहरे लपलेले आहेत. म्हणजे तुम्हाला पाहायला जरी, तो एकच चेहरा दिसत असला, तरी ते दोन चेहरे आहेत. पहिलं तर तुम्हाला या फोटोत दोन चेहरे शोधावे लागतील.


यातील दोन चेहरे दिसल्यानंतर तुम्हाला यातील पहिला कोणता चेहरा दिसला, यावरुन तुम्हाला तुमचं व्यक्तीमत्व कळायला आणि स्वत:ला ओळखायला मदत होणार आहे.


या व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये एक चेहरा समोर पाहात आहे. तर दुसरा चेहरा हा प्रोफाईल फोटो आहे जो उजवीकडे पाहात आहे. तेथे बाजूला असलेल्या काळ्या रंगामुळे आपल्याला या फोटोकडे पाहाताना ऑप्टिकल इल्यूजन होत आहे.


आता तुम्हाला दिसलेला चेहरा तुमच्या व्यक्तीमत्वाबाबत काय सांगतो पाहा.


पहिला चेहरा काय म्हणतो?


जर तुम्हाला प्रथम प्रोफाइल चेहरा दिसला तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही भावनेच्या भरात वाहून जाणार्‍या लोकांपैकी नाही आहात, उलट तुम्ही प्रत्येक आव्हानाला तोंड देण्यास सक्षम आहात. यासोबतच, तुम्ही सकारात्मक विचारसरणीचे आणि आशावादी व्यक्ती आहात, जी नेहमी सर्वांच्या मदतीसाठी तयार असते.


दुसरा चेहरा काय म्हणतो?


जर तुम्हाला चेहऱ्याची बाजू समोर पाहाताना दिसली तर याचा अर्थ असा होतो की, तुम्ही खूप दृढनिश्चयी आहात. असे लोक प्रत्येक कठीण समस्येला तोंड देण्यावर विश्वास ठेवतात. असे लोक आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि अडचणीनंतरही यशस्वी राहतात.