दिल्ली : संघ लोक सेवा आयोग (UPSC) परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते आणि दरवर्षी लाखो विद्यार्थी त्यात सहभागी होतात. परंतु फार कमी विद्यार्थी ती पास करू शकतात. यूपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप महत्त्वाचं आहे. पंजाबच्या मोगा या ठिकाणी राहणाऱ्या रितिका जिंदालसाठी हे सोपे नव्हतं. परंतु असं असतानाही तिने आयएएस होण्याचं स्वप्न सर्व अडचणींना तोंड देत पूर्ण केलंय.


लहानपणापासून आयएएस बनण्याची इच्छा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रितिकाला लहानपणापासूनच आयएएस व्हायचं होतं. ती म्हणते की, ती पंजाबची असल्याने लाला लजपत राय आणि भगतसिंग यांच्या कथा ऐकत मोठी झाली. त्या वयापासूनच देशासाठी आणि देशातील लोकांसाठी काहीतरी करण्याची इच्छा होती. अखेरीस त्याने यूपीएससी सीएसई परीक्षेची निवड केली आणि जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा त्याने या दिशेने पाऊल टाकलं.


रितिका 12वीत टॉपर होती


रितिका जिंदालचा जन्म पंजाबमधील मोगामध्ये झाला आणि तिनी सुरुवातीचे शिक्षण तिथूनच पूर्ण केलं. इयत्ता 12 व्या वर्गात, रितिका संपूर्ण उत्तर भारतात सीबीएसई बोर्डात टॉप झाली. यानंतर तिने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून ग्रॅज्युएशन केलं आणि 95 टक्के गुणांसह संपूर्ण कॉलेजमध्ये तिसरा क्रमांक पटकावला.


वयाच्या 22व्या वर्षी झाली आयएएस


पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर, रितिका जिंदालने कठोर परिश्रम केले. त्यानंतर 2018 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात अखिल भारतीय नागरी सेवा परीक्षेत 88 वा क्रमांक मिळवण्याचं तिचं बालपणीचे स्वप्न पूर्ण केले. त्यावेळी रितिकाचे वय अवघे 22 वर्षे होतं.


परीक्षेपूर्वी वडिलांना कॅन्सरचं निदान


रितिका जिंदालसाठी आयएएस होण्याचा मार्ग तितका सोपा नव्हता. जेव्हा ती पहिल्यांदा यूपीएससी परीक्षेची तयारी करत होती तेव्हा तिच्या वडिलांना तोंडाच्या कॅन्सरचं निदान झालं. याचा रितिकाच्या अभ्यासावरही परिणाम झाला. यातून बाहेर येत असताना रितिका दुसऱ्यांदा परीक्षेची तयारी करत होती. तर याचवेळी तिच्या वडिलांना फुफ्फुसांच्या कॅन्सरचं निदान झालं. रितिकासाठी हा खूप कठीण काळ होता, पण तरीही तिने अडचणींचा सामना करत तयारी सुरू ठेवली.


परिक्षेची तयारी सोपी नव्हती


आपल्या आजारी वडिलांची काळजी घेत रितिका जिंदालला यूपीएससी परीक्षेची तयारी करणं खूप अवघड होतं. तिने मुलाखतीत सांगितलं की, 'मी ज्या ठिकाणाहून आली आहे ते एक लहान शहर आहे ज्यामध्ये पायाभूत सुविधा खूप कमी आहेत. प्रत्येक वेळी जेव्हा माझे वडील आजारी पडले तेव्हा आम्हाला त्यांना लुधियानाला उपचारासाठी घेऊन जावं लागलं. यावेळी मला त्यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जावे लागले. वडिलांना आयुष्याशी लढताना पाहून मला खूप बळ मिळाले आणि मी परीक्षेसाठी खूप मेहनत घेतली.