देशातील `या` ठिकाणी Petrol-Diesel शिवायच चालतात वाहनं
अभ्यासक आणि संशोधकांनुसार ....
नवी दिल्ली : जगभरात अशा अनेक गोष्टी, ठिकाणं आहेत जे पाहता आणि ज्यांच्याविषयी ऐकता आपला आपल्यावरच विश्वास बसच नाही. दैनंदिन जीवनात अशाच काही ठिकाणांबाबतची माहिती समोर येताच सध्या अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत.
मॅग्नेटीक हिल
भारतात एक असा पर्वतीय भाग आहे जिथं वाहनं पेट्रोल आणि डिझेल (Petrol-Diesel) शिवाय चालतात. लेह लडाख येथे असणारं हे ठिकाण अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय़ आहे. इथं रस्त्यांवर वाहनं आपोआपच गती पकडतात. इतकंच नव्हे, तर कोणी आपलं वाहन इथं एका ठिकाणी उभं केलं तर त्यांना ते वाहनही मिळणार नाही. आता हे नेमकं कसं होतं याचा मात्र पत्ता अद्यापही लागलेला नाही.
अभ्यासक आणि संशोधकांनुसार या पर्वतीय भागात चुंबकीय उर्जेचं प्रमाण जास्त आहे. ज्यामुळं येथे वाहनं 20 किलोमीटर प्रतितास वेगानं खेचली जातात. म्हणूनच या पर्वतीय भागाला मॅग्नेटीक हिल (Magnetic Hill) म्हणून ओळखलं जातं.
(Magnetic Hill) या पर्वतीय भागाला ग्रॅविटी हिल म्हणूनही ओळखलं जातं. इथं गुरुत्त्वाकर्षणाचा नियमही लागू होत नाही. सहसा गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार कोणत्याही वस्तूला धक्का दिला असता ती वस्तू खालच्या दिशेनं ढकलली जाते. पण, या पर्वतीय भागात मात्र य़ाविरुद्धच चित्र दिसतं.