.बक्सर: आपल्यापैकी अनेकांनी महाभारतातील बकासुराची गोष्ट ऐकली असेल. त्याच्या खाण्याचे किस्से आणि उदाहरणे अनेकदा दिली जातात. सध्या बिहारच्या बक्सर येथील क्वारंटाईन सेंटरमधील लोकांना काहीसा असाच प्रत्यय  येत आहे. याठिकाणी असणाऱ्या अनुप ओझा या २३ वर्षीय तरुणाची सध्या सोशल मीडियावर भलतीच चर्चा आहे. या तरुणाला दिवसाला ४० चपात्या आणि १० प्लेट भातचा खुराक लागत असल्याचे सांगितले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...म्हणून रेल्वे रुळावर झोपलो, मजुराने सांगितली 'त्या' रात्रीची व्यथा
 
काही दिवसांपूर्वी क्वारंटाईन सेंटरमध्ये 'लिट्टी' हा पदार्थ तयार करण्यात आला होता. त्यावेळी अनुपने एकट्यानेच ८३ लिट्टी खाऊन सर्वांना अचंबित करुन सोडले. अनुपच्या या आहारामुळे आता क्वारंटाईन सेंटरमध्ये अन्नधान्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. एकट्या अनुपसाठी ४० चपात्या बनवाव्या लागत असल्याने येथील आचारीही वैतागले आहेत. अधिकाऱ्यांना हा प्रकार समजला तेव्हा सुरुवातीला त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही.


'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!


त्यामुळे अधिकाऱ्यांनी क्वांरटाईन सेंटरला भेट दिली. तेव्हा अनुपचा खुराक पाहून त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, तरीही प्रशासनाने अनुपला हवे तेवढे जेवण देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच अनुप ओझाचा क्वारंटाईनचा कालावधी संपणार आहे. त्यामुळे अनुपला अन्नाची कमी भासून देऊ नका, असे आदेश अधिकाऱ्यांनी कँटीनवाल्यांना दिले आहेत. 


दरम्यान, बिहारमध्ये आतापर्यंत ३,०६१ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. परराज्यात रोजगारासाठी गेलेले अनेक मजूर सध्या बिहारमध्ये परतत आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठ्याप्रमाणावर या मजुरांची व्यवस्था करावी लागत आहे.