रतन टाटा यांचा 'हा' चित्रपट होता फेव्हरेट, तर नेटफ्लिक्सवरची सीरिज होती आवडीची

Ratan Tata Favourite Film and Web Series : ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण, टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं पार्थिव अनंतात विलीन झालं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात टाटा समुहाचं जाळ पसरलं आहे. 86 वर्षीय रतन टाटा यांनी चित्रपटांमध्येही हात आजमावला. पण तो त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. असं असलं तरी रतन टाटा यांचा चित्रपटांशी लगाव होता. त्यांच्या आवडीच्या चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. पण रतन टाटा कधीही चित्रपट पाहाण्यासाठी थिएटरमध्ये गेले नाहीत.  

| Oct 10, 2024, 18:52 PM IST
1/7

रतन टाटा यांना चित्रपटांशी विशेष लगाव होता, पण ते बॉलिवूड चित्रपट फारसे पाहायचे नाहीत. 86 वर्षीय रतन टाटा यांनी चित्रपटांमध्येही हात आजमावला. पण तो त्यांचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे रतन टाटा चित्रपट पाहण्यासाठी कधीच थिएटरमध्ये गेले नाहीत.

2/7

रतन टाटा बॉलिवूड चित्रपट फारसे पाहात नसले तरी बॉलिवूड अभिनेत्री सिमी गरेवालबरोबर त्यांचं नाव जोडलं गेलं होतं. एका मुलाखतीत सिमी गरेवालने रतन टाटा यांच्याबरोबर प्रेम संबंध असल्याची कबुली दिली होती. 

3/7

2020 मध्ये बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत रतन टाटा यांच्या अगदी जवळचा असलेल्या शांतनु नायडूने रतन टाटा यांच्या चित्रपट प्रेमाविषयी सांगितलं होतं. शांतनुने रतन टाटा यांच्या फेव्हरेट चित्रपटांची यादीच सांगितली होती.

4/7

रतन टाटा यांनी हॉलिवूड अॅक्शन कॉमेडी चित्रपट पाहायला आवडायचं. हॉलिवूडमधला त्यांचा आवडीचा चित्रपट होता 'द अदर गाय'. यात अभिनेते Will Ferrell आणि  Mark Wahlberg प्रमुख भूमिकेत होते.

5/7

याशिवाय 'द लोन रेंजर' हा चित्रपटही रतन टाटा यांना आवडायचा. हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला होता आणि यात जॉन डिप आणि आर्मी हॅमर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या मुलाखतीत शांतनुने रतन टाटा यांच्या फेव्हरेट वेब सीरिज कोणती आहे हे देखेली सांगितलं होतं. 

6/7

रतन टाटा यांची फेव्हरेट वेब सीरिज नेटफ्लिक्सवरची 'फौदा' होती. यात इस्त्रायल डिफेंस फोर्स दाखवण्यात आली होती.

7/7

बॉलिवूड चित्रपटात खूप रक्तपात दाखवला जातो, असं रतन टाटा यांचं मत होतं. रक्त दाखवण्यासाठी जितका केचअप वापरला जातो, तितका मुंबईतल्या हॉटेलमध्येही नसेल असं ते म्हणत.