नवी दिल्ली : भाजपचे खासदार असलेले शत्रुघ्न सिन्हा मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याच शत्रुघ्न सिन्हांनी राजकारणातील त्यांच्या सगळ्यात जवळच्या मित्राबद्दल भाष्यं केलं आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हे माझे सगळ्यात चांगले मित्र आहेत, असं शत्रुघ्न सिन्हा म्हणाले आहेत. शत्रुघ्न सिन्हांनी लालूंचा मुलगा तेज प्रताप यादव याच्या मुलाच्या साखरपुड्यातला फोटो शेअर केला आहे. तेज प्रताप याचा साखरपुडा ऐश्वर्या रायबरोबर झाला आहे. सिन्हांनी या कार्यक्रमात तेजस्वी यादव आणि राबडी देवींचीही भेट घेतली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लालू प्रसाद यादव मात्र या साखरपुड्याला उपस्थित राहू शकले नाही. चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव शिक्षा भोगत आहेत. मुत्रपिंडाला दुखापत झाल्यामुळे लालू प्रसाद यादव यांच्यावर दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साखरपुड्याला वडिलांची कमी जाणवली अशी प्रतिक्रिया लालूंचा मुलगा आणि बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दिली आहे. लालूंना जामीन मिळाला तर ते लग्नाला उपस्थित राहतील, असं तेजस्वी यादव म्हणाले.


ऐश्वर्या रायसोबत विवाह


बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा प्रसाद राय यांची मुलगी आणि परसा विधानसभा क्षेत्रातील राजदच्या आमदार चंद्रिका राय यांची ही मुलगी आहे. तेजप्रताप आणि ऐश्वर्याचा साखपपुडा पटनातील मौर्या हॉटेलमध्ये १२ मेला होणार आहे. राजदचे आमदार आणि माजी मंत्री चंद्रिका राय यांनी देखील शुक्रवारी विवाहबद्दल माहिती दिली. ऐश्वर्या रायने आपलं शिक्षण पटनामधून केलं आहे. त्यानंतर दिल्लीमध्ये पुढचं शिक्षण पूर्ण केलं.