TVS Motor share : शेअर मार्केट हे असं एक मार्केट आहे जिथे दररोज नवे बदल होत असतात. इथे सतत चढ-उतार होत असतात. या चढ-उतारात गुंतवणूकदारांना नफाही मिळतो आणि काही वेळा त्यांना तोटाही सहन करावा लागतो. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी (long term investors) चांगल्या shares मध्ये पैसे गुंतवले तर नफा मिळण्याची शक्यता वाढते. share market मध्ये असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

auto sector मधील शेअर्सचा गुंतवणदारांना चांगलाच फायदा होतो. या क्षेत्रातील शेअरने गुंतवणूकदारांना अनेक पटींनी returns दिले आहेत. एक काळ असा होता जेव्हा अशाच एका शेअरची किंमत खूपच कमी होती. 


TVS Motor (TVS Motor Company Limited) ची किंमत अशी गेली वाढत...


27 जुलै 2001 रोजी NSE वर TVS मोटरच्या शेअरची closing value 4.01 रुपये होती. हळूहळू वाढ होत 2014 मध्ये TVS मोटरच्या शेअरने प्रथमच 100 रुपयांची किंमत पार केली होती. त्यापुढे या स्टोकने चांगला वेग पकडला आणि परत या स्टोकची किंमत 100 च्या खाली गेलीच नाही. या शेअरमध्ये जोरात तेजी पाहायला मिळाली आणि म्हणता म्हणता हा शेअर 2017 पर्यंत 700 रुपयांच्या पुढे गेला. 


लॉकडाऊनच्या परिणामावरही मात...
या स्टॉकमध्ये सातत्याने घसरण होत गेली आणि एप्रिल 2020 पर्यंत हा स्टॉक 300 रुपयांच्या खाली आला. मात्र यानंतर पुन्हा एकदा TVS मोटरच्या स्टॉकने वेग घेतला. 


आता आहे ही स्थिती...
आज याच शेअरचा भाव 900 रुपयांच्या पुढे गेला आहे. अलीकडेच या शेअरने रु. 953.30 आणि 52चा उच्चांक गाठला आहे. 29 जुलै 2022 रोजी TVS मोटरच्या शेअरने NSE वर रु. 904.40 च्या किमतीचे closing केले आहे.