Multibagger Stock: `या` कपंनीचा शेअर पोहचलाय 5.57 रूपयांवरून 2000 रूपयांवर, हा शेअर तुमच्याकडे आहे का?
शेअर बाजारातून जसा आपल्याला फायदा होतो तसाच येथे धोकाही जास्त असतो.
Multibagger Stock: शेअर मार्केटमध्ये दररोज चढाओढ दिसत असते. मोठा नोकरदारवर्ग शेअर बाजारात पैसे गुंतवत असतो तेव्हा शेअर बाजारात नक्की कसे? आणि कुठे पैसे गुंतवावे? याचे ज्ञान असणे आवश्यक असते. शेअर बाजारातून जसा आपल्याला फायदा होतो तसाच येथे धोका (risk) ही जास्त असतो.
कुठली कंपनी किती रिटर्न्स देते?, त्याचे शेअर किती रूपयांवर ओपन झाले? आणि क्लोज झाले? याची सर्व माहिती एक शेअर मार्केट गुंतवणूकदार म्हणून तूम्ही करून घेत असताच. तेव्हा आता अशा एका शेअरबद्दल जाणून घेऊया ज्याने गुंतवणूकदारांना चक्क 35,609% परतावा (returns) दिला आहे.
CPVC पाईप बनवणाऱ्या Astral Ltd. च्या शेअर्सने गुंतवणूकदारांना 35,609% परतावा दिला आहे. Astral Limited शेअर मार्केटमध्ये ओपन झाल्यापासून आतापर्यंत या कंपनीने गुंतवणूकदारांना 35,609% परतावा देत 175% चा dividend देखील जाहीर केला आहे. कंपनीने शेअर बाजारात अवघ्या 5.57 रुपयांच्या शेअरसह entry केली होती आज हाच शेअर 2000 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
Astral Ltd ने म्हटले आहे की कंपनीने 2021-22 साठी 1 रुपये दर्शनी मूल्यावर (face value) 1.75 रुपये लाभांश (dividend) देण्याची शिफारस केली आहे. हा dividend 175% एवढा आहे. कंपनीची 45 वी Annual General Meeting 5 सप्टेंबर रोजी आहे. या बैठकीनंतर हा dividend भागधारकांना दिला जाईल. यासाठी कंपनीने 22 ऑगस्ट 2022 ही record date ठेवली आहे.
अशी झाली सुरूवात...
Astral Limited कंपनीचे शेअर्स शुक्रवारी 1.31% च्या उच्चांकावर होते ते 1989 रुपयांवर close झाले. 2007 मध्ये जेव्हा कंपनीने शेअर बाजारात entry केली तेव्हा कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 5.57 रुपये एवढी होती. आता हाच शेअर 1989 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच याचा अर्थ आतापर्यंत कंपनीच्या multibagger stock ने गुंतवणूकदारांना 35,609.16% परतावा दिला आहे. कंपनीचे market cap 40,076.74 कोटी रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 16.95% इतकी वाढ झाली आहे.