तिरुअनंतपुरम : कोरोना वायरसच्या संकटातून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणते पॅकेज जारी न केल्याने त्यांच्यावर देशभरातून टीका होत आहे. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्यांच्यावर निशाणा साधल्यानंतर केरळचे अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी देखील टीका केली आहे. आम्हाला कौतूक नकोय, सहकार्य हवंय अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला सुनावले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला बॅंका खूप व्याज वसूल करत आहेत. राज्यांना केंद्राकडून कौतुकाची नव्हे तर आर्थिक मदतीची अपेक्षा होती. पण पंतप्रधानांनी याबद्दल एक वाक्यही काढले नसल्याची टीका इसाक यांनी सुनावले आहे.


जेव्हा आम्ही कर्जासाठी बॅंकांकडे जातो तेव्हा आम्हाला व्याजदर ९ टक्के असल्याचे सांगितले जाते. अनेक राज्यांनी ५००-१००० रुपयांपर्यंत उधारी ठेवली असून त्यांच्या कमाई मार्गात कपात झाली आहे. राज्यांच्या उत्पन्नाचे इतर मार्ग देखील बंद झाले आहेत. 


लॉकडाऊनचे दिवस वाढवल्याने कोरोनाच्या संसर्गावर आळा बसेल. पण आर्थिक स्थितीचे काय ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केंद्राने यावर परिक्षण करावे असे देखील त्यांनी सुचवले आहे.