नवी दिल्ली :  देशात गेल्या तीन वर्षात बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे किती लोकांनी आत्महत्या याची आकडेवारी आज केंद्र सरकारने सादर केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारने दिलेल्या माहितीनुसार 2018 ते 2020 दरम्यान दिवाळखोरी किंवा कर्जबाजारीपणामुळे 16,000 हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या, तर 9,140 लोक बेरोजगारीमुळे आपलं जीवन संपवलं.


कोणत्या वर्षात किती आत्महत्या
गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. ते म्हणाले की 2020 मध्ये 3,548, 2019 मध्ये 2,851 आणि 2018 मध्ये 2,741 लोकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केल्या.


कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या
2020 मध्ये दिवाळखोरी किंवा कर्जामुळे 5,213 लोकांनी आत्महत्या केल्या, 2019 मध्ये 5,908 आणि 2018 मध्ये 4,970 लोकांनी आत्महत्या केल्या. राय म्हणाले की, सरकार मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करून आणि रोजगाराच्या संधी निर्माण करून या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करत आहे.


बेरोजगारीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक
संसदेत सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान, विरोधी खासदारांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे.  कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर देशासमोर असलेल्या समस्येला तोंड देण्यासाठी बजेटमध्ये फारच कमी तरतूद केली गेली असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे.