नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांना एका व्यक्तीने कॉल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका तासात जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या फोननंचर एकच खळबळ उडाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोनवर एका अज्ञात व्यक्तीने योगींना वाचवण्यासाठी पोलिसांकडे फक्त एका तासाचा वेळ असल्याचं म्हटलं आहे. दिल्ली पोलीस याची चौकशी करत आहे.


एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, गुरुवारी दुपारी जवळपास तीन वाजता दिल्ली पोलीस कंट्रोल रूममध्ये एक फोन आला. ज्यामध्ये योगींनी जीवे मारणार असल्याचं म्हटलं गेलं. पोलिसांकडे योगींना वाचवण्यासाठी फक्त एक तास आहे असं म्हणत फोन लगेच कट झाला.