मुंबई : जर तुम्ही नोकरदार वर्गात आहात आणि बॅंकेची काम संपवण्यासाठी तुमच्याकडे शनिवारच असतो तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.   कारण पुढच्या आठवड्यातील शनिवारपासून बॅंक 3 दिवस बंद राहणार आहे. पुढच्या आठवड्यात 12 ते 14 जानेवारी पर्यंत बॅंकांना सुट्टी असणार आहे. 12 जानेवारीला दुसरा शनिवार असल्याने बॅंक बंद राहील.  13 जानेवारीला बॅंकेला रविवारची सुट्टी असेल. 14 जानेवारी (सोमवारी) मकर संक्रांत/पोंगल असल्याने बॅंक बंद राहील. त्यामुळे बॅंकेशी संबधित व्यवहार या काळात बंद राहतील.


डिजीटल व्यवहार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


या गोष्टींचा विचार केलात तर तुम्ही ऐनवेळी कॅश नसल्याने होणाऱ्या गोंधळातून वाचू शकता.  तुमच्याकडे थोडीफार कॅश असणे गरजेचे आहे. तुम्हाला या दिवसात डेबिट किंवा क्रेडीट कार्डचा वापर करावा लागेल. असं असेल तर तुमचं काम कॅशमुळे अडणार नाही. यासोबतच तुम्ही गुगल प्ले, पेटीएम, भीम अॅप अशा युपीआयचा वापर करुन व्यवहार करु शकता.  डिजीटल व्यवहारावर जास्त भर दिल्यास तुम्ही कॅश ठेवण्याच्या कटकटीपासून वाचू शकता.