धनबाद : फूटबॉल मॅच पाहत असताना तीन जणांचा अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. झारखंडच्या धनबाद जिल्हयात हा प्रकार समोर आला आहे. पाहूयात काय आहे हा संपूर्ण प्रकार...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, धनबाद जिल्ह्यातील तेतुलिया परिसरात फूटबॉल मॅच सुरु होती. ही मॅच पाहण्यासाठी अनेक नागरिकांनी उपस्थिती लावली. मात्र, मॅच पाहत असतानाच असा काही प्रकार घडला की ज्यामुळे तिघांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनबाद पासून ३० किलोमीटर दूर असलेल्या धनबाद परिसरात फूटबॉल मॅचचं आयोजन करण्यात आलं होतं. मॅच सुरु असताना अचानक आकाशात वीज चमकण्यास सुरुवात झाली. त्याच दरम्यान वीजही कोसळली.


या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर सहाजण जखमी झाले आहेत. मॅच पाहण्यासाठी आलेल्या इतरांनी सर्वांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र, त्यापैकी तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.