नोकरी करत पगारापेक्षा जास्त कमावण्याचे 3 मार्ग; कंपनीही रोखू शकणार नाही, उलट HR कौतुक करेल
नोकरदार वर्गाला कधीही आपला पगार पुरत नाही. आपल्या गरजा पूर्ण करताना पगार नेहमीच कमी पडत असतो. प्रत्येकाची पगारापेक्षा जास्त कमावण्याची इच्छा असते, मात्र दुसरा व्यवसाय किंवा इतर काम करण्याची परवानगी नसल्याने ते शक्य होत नाही.
जास्त पैसे कमावण्याची इच्छा नाही अशी व्यक्ती भेटणं थोडं दुर्मिळच आहे. पण पैसे कमावणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पैसे कमावण्यासाठी हुशारी आणि कष्ट या दोन्ही गोष्टी लागतात. त्यात बरेचजण नोकरी करत असल्याने एखादा व्यवसाय करण्याची इच्छा असतानाही ते शक्य होत नाही. तसंच कंपनीच्या नियमांमुळे रिकाम्या वेळेत दुसरी नोकरी करता येत नाही. पण मग अशा स्थितीत जास्त पैसे कमावत श्रीमंत व्हायचं कसं? याची चिंता प्रत्येकाला असते.
जर तुम्ही देखील नोकरी करत असाल आणि अतिरिक्त पैसे कमावण्याचा विचार करत असाल तर पगारापेक्षा जास्त पैसे कसे कमवायचे याबद्दल जाणून घ्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तुमच्या कंपनीला किंवा एचआरला यामध्ये कोणताही आक्षेप नसेल. या 3 पद्धती तुम्हाला निष्क्रिय उत्पन्न मिळविण्यात मदत करतील.
1- एंजेल गुंतवणूक
आजच्या काळात स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढत आहे. तथापि, बरेच लोक स्टार्टअप सुरू करण्याची हिंमत एकवटण्यात असमर्थ ठरतात. परंतु त्यांच्याकडे काही अतिरिक्त पैसे असतात जे ते व्यवसायात गुंतवू शकतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल तर तुम्ही अशा लोकांचा शोध घ्या जे स्टार्टअप सुरू करण्याचा विचार करत आहेत आणि जे तुम्हाला स्टार्टअप किंवा व्यवसायात यशस्वी होण्यास सक्षम आहेत असे वाटते. अशा लोकांच्या व्यवसायात पैसे गुंतवून तुम्ही एंजेल गुंतवणूकदार बनू शकता आणि पगाराव्यतिरिक्त काही अतिरिक्त उत्पन्न मिळवू शकता.
2- मित्र, नातेवाईकांना कर्ज
तुमच्या एखाद्या मित्राला किंवा नातेवाईकाला पैशांची गरज असताना ते बँकेत कर्जासाठी अर्ज करताना तुम्ही अनेकदा पाहिले असेल. जर तुम्हाला हा मित्र किंवा नातेवाईक वेळेवर सर्व पैसे परत करेल याची खात्री असेल तर तुम्ही त्यांना कर्ज देऊ शकता आणि त्यावर व्याज मिळवू शकता. हा दोघांसाठीही फायदेशीर करार होऊ शकतो. तुम्ही एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास सध्या जास्तीत जास्त 7 ते 8 टक्के व्याज मिळेल. दुसरीकडे तुमच्या मित्राला कर्ज घेताना किमान 13-15 टक्के व्याज द्यावे लागेल. जर तुम्ही तुमच्या मित्राला 10 ते 11 टक्के व्याजाने कर्ज दिलं तर दोघांचाही फायदा होईल. याशिवाय प्रोसेसिंग फीदेखील भरावी लागणार नाही.
3- शेअर बाजार और म्युचूअल फंड
जर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये रस असेल तर निष्क्रिय उत्पन्न मिळविण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तुम्ही काही संशोधन करून चांगले शेअर्स निवडू शकता आणि त्यात पैसे गुंतवू शकता. मात्र, जर तुमच्यात जोखीम स्विकारण्याची ताकद असेल तरच शेअर बाजारात पैसे गुंतवा. जर तुम्ही खूप कमी जोखीम घेऊ शकत असाल तर तुम्ही म्युच्युअल फंडाची निवड करू शकता. शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातून तुम्ही सरासरी 12 ते 13 टक्के परतावा मिळवू शकता. जर तुम्हाला चांगले शेअर्स निवडता आले तर तुम्हाला आणखी नफा मिळू शकतो.