सोमनाथ मंदिराखाली मिळाली चक्क तीन मजली इमारत
गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराखाली तीन मजली इमारत सापडली आहे. या मंदिराखालच्या खोदकामात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे सोमनाथचा इतिहास नव्यानं उलगडणार आहे. आयआय़टी गांधीनगर आणि पुरातत्व विभागाला मोठं यश मिळालं आहे.
मुंबई : गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराखाली तीन मजली इमारत सापडली आहे. या मंदिराखालच्या खोदकामात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे सोमनाथचा इतिहास नव्यानं उलगडणार आहे. आयआय़टी गांधीनगर आणि पुरातत्व विभागाला मोठं यश मिळालं आहे.
सोमनाथ मंदिराखाली तीन मजली इमारत सापडली. या मंदिराजवळ खोदकाम करावं, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं. त्यानुसार पुरातत्व विभागानं आणि आयआयटी गांधीनगरनं खोदकाम केलं. त्यामध्ये एल आकाराची एक वास्तू सापडलीय. जमिनीच्या खाली १२ मीटर ही वास्तू सापडलीय. त्याला एक प्रवेशद्वारही आहे. या खोदकामासाठी ५ कोटी खर्च करण्यात आले. या खोदकामात काही बुद्ध लेण्याही सापडल्या आहेत.
सोमनाथ मंदिर अनेक वेळा मुस्लीम राजांच्या आक्रमणामध्ये नष्ट करण्यात आलं होतं. अनेकवेळा हे मंदिर पाडण्यात आलं आणि बांधण्यात आलं. सातव्या शतकात मैत्रक राजानं बांधलेलं हे मंदिर अरबांनी पाडलं. मग परिहार राजा नागभट्टनं पुन्हा हे मंदिर बांधलं. पुन्हा ते नष्ट झालं. राजा भीमदेव, कुमार पाल यांनी पुन्हा हे मंदिर बांधलं. १७०६ मध्ये औरंगजेबानं हे मंदिर उद्वस्त केलं. त्यानंतर थेट १९५१ मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांनी सोमनाथाचं मंदिर बांधलं.
अनेक आक्रमणांमध्ये नष्ट झालेलं हे मंदिर पुन्हा पुन्हा उभं राहिलं. त्यामुळेच इथल्या खोदकामात तीन मजल्यांची नवी इमारत सापडली. यानिमित्तानं नवा इतिहासही उलगडणार आहे.