श्रीनगर : काश्मीरमध्ये श्रीनगर जिल्ह्यातल्या फतेहकदाल गावात पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. तिन्ही दहशतवादी लष्कर ए तोएबाशी संबधित असल्याचं पुढे आलं आहे. पहाटेच्या गोळीबारानंतर गोळीबार थांबला असून शोधमोहीम सुरू झाली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कारवाईत एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. पोलिसांना या भागात दहशवतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान दोन्ही बाजून गोळीबार झाला.


याआधी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांच्या छावणीवर हल्ला केला होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे दोन जवान जखमी झाले होते.