भोपाळ : लग्नात नवरी आणि नवऱ्याने काय घालावे हे लग्नाच्या आधीच ठरवले जाते. या घटनेतही तसेच झाले. मात्र लग्नाच्या दिवशी शेरवानी परीधान केल्याने संतप्त झालेल्या नवरीकडच्या मंडळींनी नवऱ्याच्या वऱ्हाड्यांवर दगडफेक करत बेदम मारहाण केल्याची घटना घडली. घटनेत चार जण जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये ही घटना घडली आहे. घटनेची चर्चा सर्वत्र रंगली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मध्य प्रदेशच्या धार जिल्ह्यातील एका गावात लग्न होते. यावेळी लग्नादरम्यान नवऱ्याने शेरवानी घातली होती. लग्नाआधीच वराला धोती-कुर्ता घालण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. मात्र तसे न करता वर सुंदरलाल शेरवानी घालत लग्नात आला होता. 


नवऱ्याने घातलेल्या शेरवानीवर मुलीकडील नवरीची काकी झिग्गूबाईंनी हिने तीव्र आक्षेप घेतला होता. परंपरेनुसार धोती कुर्ता घालून कुलदेवीसमोर फेऱ्या मारल्या जातात, असा तिचे म्हणणे होते.मात्र नवरीकडच्यांची ही अट नवऱ्याकडच्यांना मान्य नव्हती. 


वऱ्हाडी मात्र नवरदेव शेरवाणीवरच सर्व विधी करेल असा ठाम निर्धार करून आलेले. तर सात फेरे घेताना नवरदेवाने धोती-कुर्ता घालावा, असा मुलीच्या बाजूचा आग्रह होता. नवरीने नवऱ्याला शेरवानीऐवजी धोती-कुर्ता घालण्याचा आग्रह केला होता. मात्र यात दोन्ही बाजूने बाचाबाची झाली. 


बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. नवरीकडच्यांकडून वऱ्हाड्यांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 4 जण जखमी झाले. यानंतर दोन्ही पक्ष पोलिस ठाण्यात येत नवरी वधू आणि नवरा अशा  दोन्ही पक्षांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.