नवी दिल्ली : येत्या 24 तासात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगढ, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 50 ते 70 किमी प्रति तास इतका या वादळाची गती असू शकते असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. स्थानिक प्रशासनाला यामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर भारतात या वादळाचा सर्वाधिक तडाखा बसण्याची शक्यता आहे. बिहार, पश्चिम बंगाल, सिक्किम, मेघालय, नगालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, तमिळनाडू तसंच केरळच्या काही भागामध्ये या वादळ्य़ाचा तडाखा बसू शकतो. तमिळनाडू, दक्षिण कर्नाटक आणि केरळत्या काही भागात पावसाची शक्यता आहे. मध्यरात्री या वादळाने उत्तर भारतात धडक दिली. अनेक भागात पाऊस देखील झाला. काही भागामध्ये आज शाळेंना सुट्टी देण्यात आली आहे. मेट्रो, विमान सेवेवर देखील याचा प्रभाव पाहायला मिळत आहे. अनेक भागात या वादळामुळे वीज सेवा बंद झाली आहे. 


त्रिपुरामध्ये काही भागात मोठं नुकसान झालं आहे. एका महिलेचा या वादळात मृत्यू झाला आहे. मागील 48 तासात 1800 घरं पडली आहेत. सर्वाधिक प्रभाव असलेल्या खोवाई भागात 16 रिलीफ कँम्प उभारण्यात आले आहेत. ज्यामध्ये 2500 लोकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आलं आहे. बदललेल्या वातावरणामुळे हिमाचलमध्ये बर्फवृष्टी झाली आहे.