नवी दिल्ली  : धुळीचं वादळ चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये धडकलंय. रात्री या वादाळाचा तडाखा दिल्ली आणि उत्तर प्रदेशला बसला.  या वादळामुळे दिल्ली आणि उत्तर प्रदेशात वेगानं वारे वाहत असून अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत झालाय. काही भागत वादळीवाऱ्यासह पाऊसही झालाय.राजस्थान आणि हरयाणाला या वादळाचा सर्वाधिक फटका बसलाय.  ताशी ७० किमी वेगानं वारे वाहतील असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. त्यामुळे गरज नसल्यास घराबाहे पडू नका अशा सूचना देण्यात आल्यात..  या वादळाचा फटका हरयाणा, राजस्थान, पंजाब, उत्तरप्रदेश, हिमाचल  प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मिर आणि दिल्लीसह १५ राज्यांना बसणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्ली सरकारनं खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय. वाऱ्याचा वेग ताशी ९० किमीवर गेल्यास मेट्रोसेवाही  बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी एक टीमही तयार केलीये.. उत्तर प्रदेशातही आज शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.