नवी दिल्ली : बिबट्याने गेटवर चढून वाघाची शिकार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याच दरम्यान पर्यटकांमधून लपलेला एक वाघ कुत्र्याची शिकार करत असल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये पाहू शकता की जंगल सफारीसाठी पर्यटक जात आहेत. या दरम्यान वाघाला पाहण्यासाठी सर्वजण उभे आहात. मात्र या पर्यटकांच्या गाड्यांमागे एक वाघ शिकारीसाठी दबा धरून बसला आहे.


जंगल सफारी दरम्यान एक कुत्रा तिथे फिरताना दिसत आहे. या कुत्र्याला कोणतीच वाघ आजूबाजूला असल्याची कल्पना नव्हती. अचानक दोन गाड्यांच्या मधून दबा धरून बसलेला वाघ समोर आला आणि त्याने कुत्र्याची काही क्षणात शिकार केली. 


कुत्र्याच्या शिकारीचा लाईव्ह थरार पर्यटकांना पाहायला मिळाला खरा. पण अशा प्रकारे पर्यटकांचा जीवही धोक्यात होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती मिळू शकली नाही. पण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.