Viral Video : अचानक वाघ समोर येताच लोकांचा हुल्लडपणा
काय झालं पाहा...
नवी दिल्ली : प्रत्येक व्यक्तीचे वेग-वेगळे छंद असतात. काहींना फोटो काढायला आवडतात, तर काहींना फिरायला. एवढचं नाही तर कित्येकांना जंगल सफारीची आवड असते. मात्र जंगलाची सफारी करताना काही नियम आणि कायदे देखील असतात. त्यामुळे सफारी करताना कधीही काळजी घ्यायलाच हवी. सध्या जंगल सफारीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जंगल सफारी करत असलेल्या एका ग्रुपचा हुल्लडपणा समोर आला आहे.
जंगलची सफारी करत असताना एक वाघ अचानक लोकांच्या समोर आला. तेव्हा काही लोकं घाबरून ओरडायला लागले तर एक जण चक्क वाघाचे फोटो काढण्यात दंग झाला आहे. पण त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून त्यांना वाघाने काही केलं नाही.
हा व्हिडिओ एयएफएस सुशांत नंदाने शेअर केला आहे. त्यांना व्हिडिओ शेअर करत 'जेव्हा माणसाचं डोक काम करत नाही तेव्हा फक्त फक्त आवाज वाढतो.' वाघाने आपला राग प्य़ायला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.