मुंबई : हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची मजा घ्यायला सर्वनांच आवडते. हात-पाय गोठवणाऱ्या थंडीत शरीरात ऊर्जा आणि उब जागवण्यासाठी कुणी चहाचा आधार घेत तर कुणी चादरीचा. अशा गारठ्यात एका वाघिणीचा चक्क एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता वाघीण गाडीतून बाहेर येत असताना तिच्या तोंडातून धूर निघत आहे. IFS अधिकारी प्रवीण कासवान यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वाघिणीने धुम्रपान केलं आहे का? असा मजेशीर प्रश्न देखील विचारला जात आहे.


या व्हिडीओमध्ये आपण पाहिलं तर वाघिणीच्या तोंडातून वाफा निघत आहेत. हुडहुडी भरवणाऱ्या थंडीत वाघिणीच्या तोंडातून या वाफा निघत असल्यानं सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. प्रत्यक्षात मात्र वाघिणीनं धुम्रपान केलं नाही.



हा व्हिडीओ मध्य प्रदेशातील बांधवगड परिसरातील असल्याची माहिती मिळाली आहे. या वाघिणीकडे पाहून तिथे किती जास्त थंडी असेल याचा अंदाज आपण लावू शकतो. हा व्हिडीओ 29 हजारहून युझर्सनी पाहिला आहे. तर युझर्सनी देखील मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.


अनेक युझर्सनी वाघिणी हुक्का पार्टी करून आली असंही म्हटलं आहे. प्रत्यक्षात मात्र बाहेर घसरलेल्या तापमानामुळे वाघिणीच्या तोंडातून गरम वाफा येत आहेत. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तुफान मजेशीर कमेंट्स युझर्सनी केल्या आहेत.