TikTok : युजर्सच्या माहितीचा गैरवापर केल्याने भारत सरकारने अनेक चिनी मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. त्यामध्ये पब्जीसह (PUBG) टिकटॉकचाही (TikTok) समावेश होता. हे दोन्ही अ‍ॅप भारतात मोठ्याप्रमाणात लोकप्रिय होते. त्यानंतर पब्जी बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाच्या (BGMI) रुपात भारतात लॉन्च करण्यात आले होते. पण काही दिवसांपूर्वी यावरही बंदी घालण्यात आली आहे. परंतु आता या दोघांच्याही पुनरागमनाच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे चाहत्यांना याबाबत मोठी उत्सुकता लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिकटॉकवर भारतामध्ये बऱ्याच काळापासून बंदी घालण्यात आली आहे. परंतु याच्याशी संबधित लोकांच्या म्हणण्यानुसार, टिक-टॉक पुन्हा भारतात येऊ शकते. जरअसे झाल्यास, नुकत्याच बंदी घातलेल्या बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) गेम पुन्हा उपलब्ध होणार आहे.


काही महिन्यांपूर्वी, टिकटॉकची मालकी असलेल्या Bytedance कंपनीने भारतात कसे पुनरागमन करायचे याबाबत मुंबईस्थित एका कंपनीशी संपर्क साधला होता. त्यानंतर आता, एक प्रमुख ई-स्पोर्ट्स आणि गेमिंग कंपनी असलेल्या स्कायस्पोर्टने (Skysports) म्हटले आहे की पुन्हा एकदा भारतातील लोक हे व्हिडिओ अॅप वापरण्यास सक्षम असतील.


स्कायस्पोर्ट्सचे सीईओ शिव नंदी म्हणाले की, जर सूत्रांवर विश्वास ठेवला तर, टिकटॉक पुन्हा एकदा भारतात पुनरागमन करणार आहे. शिव नंदी म्हणाले की, असे झाल्यास बीजीएमआय हा व्हिडिओ गेमही भारतात 100 टक्के परत येईल. काही महिन्यांपूर्वी, एका इकॉनॉमिक्स टाईमच्या अहवालात म्हटले होते की, Bytedance टिकटॉक भारतात परत आणण्यासाठी हिरानंदानी समूहाशी बोलणी करत आहे.


मात्र, सध्या भारत सरकारने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही