नवी दिल्ली : अमेरिकेचे परराष्ट्र सचिव रेक्स टिलरसन 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेदरम्यान, त्यांनी भारत सरकारचे कौतुक केले आणि पुन्हा दहशतवादाला संपवण्याची गरज व्यक्त केली.


संयुक्त पत्रकार परिषदेत रेक्स टिलरसन यांनी प्रथम भारत आणि पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. यानंतर, टिलरसन यांनी सांगितले की भारत आणि अमेरिका यांच्यात घनिष्ठ संबंध आहेत. अमेरिका भारताच्या जलद विकासाचं समर्थन करतो. यूएसने F16 आणि F18 साठी चांगली ऑफर केली आहे. अमेरिकेच्या नवीन धोरणामध्ये भारत एक महत्त्वाची भूमिका बजावेल. दहशतवादाला आता आणखी सहन केले जाणार नाही. दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका भारताबरोबरच उभा राहील. दहशतवादाला थारा देणाऱ्यांना संपवलं गेलं पाहिजे. भारत आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होईल.