Fact Check : फटाके फोडताना IAS Tina Dabi यांचा अपघात, काय आहे या Video मागील सत्य
Tina Dabi Diwali : या व्हिडीओमध्ये फटाके फोडताना त्यांचासोबत अपघात झाला आहे. फटाके फोडताना त्यांचा तोंडावर ठिणग्या उडतात. या अपघातात टीना डाबी या थोडक्यात बचावल्या आहेत.
IAS Tina Dabi Diwali Video : संपूर्ण देशामध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात दिवाळी (Diwali 2022) साजरी करण्यात आली. लक्ष्मीपूजन केल्यानंतर अनेकांनी फटाके फोडण्याचा आनंद लुटला. जम्मू कश्मीरची टॉपर आणि IAS टीना डाबी (Tina Dabi) कुठल्या ना कुठल्या कारणामुळे कायम चर्चेत राहतात. त्यांचा एक व्हिडीओ दिवाळीच्या दिवसांमध्ये तुफान व्हायरल (video viral on social media) होतो आहे. या व्हिडीओमध्ये फटाके फोडताना त्यांचासोबत अपघात झाला आहे. फटाके फोडताना त्यांचा तोंडावर ठिणग्या उडतात. या अपघातात टीना डाबी या थोडक्यात बचावल्या आहेत.
काय आहे या Video मागील सत्य
दिवाळीच्या दिवसांमध्ये व्हायरल झालेला हा अतिशय धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून दिवाळीचे फटाके फोडताना टीना डाबी यांच्यासोबत दुर्घटना घडल्याचं वाटतं आहे. पण थांबा आम्ही तुम्हाला या व्हिडीओमागील सत्य सांगणार आहोत. हा व्हिडीओ दसऱ्याच्या दिवशीचा आहे. जेव्हा टीना डाबी यांनी रावन दहनासाठी गेल्या होत्या त्यावेळी त्यांचासोबत ही दुर्घटना घडली होती. (tina dabi firecrackers burst video viral on social media nmp)
नेमकं झालं काय?
दसऱ्याच्या दिवशी एक व्यक्ती टीना डाबी यांना फटाके फोडण्याचा आग्रह करतो. तेव्हा त्या काळजीपूर्वक दुरुनच फटाके फोडू लागतात. पण तेव्हाच फटाक्याची ठिणगी त्यांचा चेहऱ्यावर येते. त्या मागे सरकतात म्हणून थोडक्यात त्या बचावतात. IAS टीना डाबी यांनी 2015 साली नागरी सेवा परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला होता. आयएएस टीना डाबी या सध्या राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आहेत. याशिवाय आयएएस टीना डाबी यांनीही अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सोशल मीडियावर त्याची अनेकदा चर्चा होते.