मुंबई : आंध्रप्रदेशातील तिरूमाला येथे असलेल्या व्यंकटेश्वरच्या प्रसिद्ध तिरूपती बालाजी मंदिरातील ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. असं सांगितलं जातं आहे की, इतिहासात पहिल्यांदाच भगवान व्यंकटेश्वरचे हे मंदिर 6 दिवसांकरता बंद राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 11 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 17 ऑगस्टच्या सकाळी 6 पर्यंत हे मंदिर बंद राहणार आहे. मंदिर प्रशासनाने हा निर्णय रविवारच्या बैठकीत घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना थोडा त्रास होणार आहे. 


यासाठी घेतला हा निर्णय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा निर्णय महासंप्रोक्षण अनुष्ठान करण्याकरता घेतला आहे. हा निर्णय तब्बल 12 वर्षानंतर घेण्यात आला आहे. या अनुष्ठानादरम्यान फक्त पुजारीच मंदिरात प्रवेश करून शकतात. यावेळी ते मंदिरातील साफसफाई, शु्द्धिकरण आणि डागडुजीचे काम करणार आहेत. 


पहिल्यांदाच घेतला असा निर्णय 


12 वर्षातून पहिल्यांदा होणाऱ्या या अनुष्ठानकरता हे मंदिर बंद राहणार आहे. या अगोदर अनुष्ठानाकरता काही काळ मंदिरात भाविकांना प्रवेश नसे. पण पहिल्यांदा असे 6 दिवस हे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. एका दिवसांत लाखो भक्त येतात त्यामुळे काही वेळ मंदिर बंद करणे शक्य नाही. या आधी गर्दी कमी असल्यामुळे ते शक्य होत असे.