तिरुमाला: महाराष्ट्रासह दक्षिण भारतात मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. तमिळनाडू आणि चेन्नईसह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रकोप झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं. तर रस्त्यांनी नद्यांचं रुप घेतलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील प्रसिद्ध मंदिर आणि अनेकांचं श्रद्धास्थान असलेलं तिरुपती बालाजी मंदिर असलेल्या भागातही पावसाचा प्रकोप झाला. मंदिरापर्यंत पाणी आलं होतं. त्यामुळे भाविकांची तारांबळ उडाली. भाविकांसाठी 2 तास रस्ता बंद करण्यात आला होता. 



मुसळधार पावसामुळे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुपती बालाजी मंदिरालाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. तिरुमाला तिरुपती देवस्थानने मंदिर भाविकांसाठी एक महत्त्वाचं निवेदन जारी केलं आहे. मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती पाहता दोन दिवस भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद राहणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. 



तिरुमला इथल्या वैकुंठम परिसरात मोठ्या प्रमाणात पावसामुळे पाणी साचलं. त्यामुळे नागरिकांचंही नुकसान झालं आहे. आंध्र प्रदेशात तर मुसळधार पावसामुळे महापूर आला. यामध्ये साधारण 30 लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. 


उत्तर गुजरातमध्ये गांधीनगर, मेहसाणा, बनासकांठा, पाटन, मूंगफली डांगर भागातील शेतीचं मुसळधार पावसानं मोठं नुकसान झालं आहे. तर महाराष्ट्रातील फळबागायतदार चिंतेत आहेत. अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.