Tirupati balaji asset : देशातील सर्वात श्रीमंत धार्मिक संस्थांपैकी एक तिरुमला तिरुपती देवस्थानने (Tirumala Trust) आपल्या मालमत्तेचा तपशील जाहीर केला आहे. कोरोना काळातही देणगीदारांची कमी नव्हती. गेल्या तीन वर्षांत सुमारे 2,900 किलो सोने तिरुपती मंदिराला दान करण्यात आले आहे. शनिवारी टीटीडीने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मंदिरात सध्या 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रुपयांची रोकड आहे. सध्याच्या विश्वस्त मंडळाने 2019 नंतरच्या गुंतवणुकीची मार्गदर्शक तत्त्वे पूर्वीपेक्षा मजबूत केली आहेत. (Tirumala Tirupati Devasthanams 's properties across India)


सोन्याचा साठा तीन वर्षांत वाढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, तिरुपती मंदिर ट्रस्टचा (Tirupati mandir Trust) सोन्याचा साठा 2019 मध्ये 7339.4 टन होता, तो आता 10.3 टन झाला आहे. गेल्या 3 वर्षात ट्रस्टच्या साठ्यात सुमारे 2.9 टन (सुमारे 2,900 किलो) वाढ झाली आहे. हे सोने सरकारी बँकांमध्ये सोन्याच्या ठेवींच्या स्वरूपात जमा आहे, ज्याची किंमत सध्याच्या किंमतीनुसार 5,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.


मंदिराची मालमत्ता 2.26 लाख कोटी रुपयांवर


गेल्या तीन वर्षांत मंदिराची निव्वळ संपत्ती 2.26 लाख कोटी रुपये झाली आहे. अहवालानुसार, TTD चे कार्यकारी अधिकारी AV धर्मा रेड्डी यांनी सांगितले की, मंदिर ट्रस्टने 2019 मध्ये विविध बँकांमध्ये मुदत ठेवींच्या रूपात सुमारे 13,025 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. ही रक्कम आता 15,938 कोटी रुपये झाली आहे. या गुंतवणुकीतही सुमारे 2,900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.


अहवालानुसार, मंदिर ट्रस्टच्या देशभरात सुमारे 960 मालमत्ता आहेत, ज्या 7,123 एकर जमिनीवर आहेत. मंदिराच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत धर्मादाय आहे, जो भक्त, व्यापारी आणि संस्थांकडून येतो.