तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजित बिश्वास यांची गोळी झाडून हत्या
भाजपने हत्येचा कट केल्याचा तृणमूल काँग्रेसचा आरोप
कोलकाता - पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची शनिवारी सायंकाळी काही अज्ञातांकडून गोळी घालून हत्या करण्यात आली. गोळीबार झाल्यानंतर तातडीने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आला परंतु त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. सत्यजीत बिश्वास यांच्या हत्येनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठी खळबळ उडाली असून हत्येमागे भाजपचा हात असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसकडून करण्यात येत आहे. पोलिसांची विशेष टीम याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
जलपाईगुडी जिल्ह्यातील फुलबाडी येथे शनिवारी सरस्वती पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी सत्यजीत बिश्वास स्टेजवरून खाली उतरत असताना अज्ञातांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कृशनगर विधानसभा मतदारसंघातील ३७ वर्षीय आमदार बिश्वास यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. ते दरम्यान, हत्येनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. राज्य सरकारने सीआयडीकडे तपासाची सुत्रे दिली आहेत.