मुंबई : देशाच्या अनेक राज्यात रोकड पैशाचा तुटवडा जाणत आहे. यामुळे आता सरकाने पैसे छपाईचं काम जोमाने सुरू केलं आहे. चारही नोट छपाई कारखान्यात 24 तास काम जोराने सुरू आहे. पैशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची छपाई जोरदार सुरू केली आहे. 70 हजार करोड रुपयांची रोकड कमी पडत असल्यामुळे मशीनने आतापर्यंत 500 आणि 200 रुपयांच्या नोटांची छपाई सुरू केली आहे. 


24 तास सुरू आहे काम 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय प्रतिभूति मुद्रण आणि मुद्रा निर्माण निगम लिमिटेडच्या चारही छपाईखान्यात 18 ते 19 तास काम चालत असे. पण आता हे काम 24 तास काम सुरू आहे. 


 


सरकार म्हणतं कॅश कमी नाही 


देशातील अधिक भागांतील एटीएममध्ये पैशाचा तुटवडा आहे अशी चर्चा होती. मात्र सरकारचा असा दावा आहे की एटीएममध्ये कॅश उपलब्ध आहे. वित्त मंत्रालयांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, जम्मू  काश्मीर, महाराष्ट्र, ओडिसा, तामिळनाडू यामध्ये 90 टक्के कॅश उपलब्ध आहे. 


नगद प्रिंटचे काम हे दर 15 दिवसांनी होत असते छपाई. मात्र नोटांच्या छपाईमुळे बाजारात पैशांचा तुटवडा निर्माण होतो. 24 तास छपाई करण्याच काम हे 2000 रुपयाची नवी नोट बाजारात आणली तेव्हा सुरू झालं.