Trending News : आता आम्ही तुमचासाठी जरा हटके बातमी आणली आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला फरार आरोपी, कैदी किंवा हरवलेल्या व्यक्तींचे पोस्टर पाहतो. या हरवलेल्या व्यक्तीला शोधून देणाऱ्यांना भरघोस बक्षीस देण्यात येतं. जर आपल्या घरातील एखादा सदस्य बेपत्ता झाला असेल तर आपला जीव कासावीस होतो. आपण त्यांना शोधण्यासाठी काही पण करतो. पोलिसांकडे तक्रार करतो आणि त्यांना आपल्या व्यक्ती शोधण्यासाठी सांगतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कर्नाटकमधील घरातील एक सदस्य बेपत्ता झाला. त्याला शोधण्यासाठी या व्यक्तीने अख्खा शहरात पोस्ट लावून बक्षीस जाहीर केलं आहे. या व्यक्ती बेपत्ता सदस्याला शोधून देण्यासाठी थोडेथोडके नाही तर 50 हजारांचं बक्षीस देण्यात येणार आहे.


कोण आहे बेपत्ता?


या व्यक्तीच्या घरातील सगळ्या प्रिय सदस्य हरवला आहे. या कुटुंबियांकडे पोपटाचं जोडप होतं. त्यातील एक पोपट 16 जुलैपासून बेपत्ता आहे. हा पोपट कुटुंबातील एक सदस्य असून तो हरवल्यामुळे कुटुंबिय दु:खात आहे. त्यामुळे मालकिणीने पोपट शोधून देणारा 50 हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 


हा आफ्रिकन जातीचा पोपट असून गेल्या अडीच वर्षांपासून तो या कुटुंबाचा भाग आहे. या कुटुंबातील मालकिणीने सर्व लोकांना विनंती केली आहे, ''माझ्या पोपटाबद्दल काही माहिती मिळाल्यास त्वरित सांगा. तसंच तुमच्या आजूबाजूला या पोपटाचा शोध घ्या.''